राजीव गांधी महाविद्यालय इंडिया आणि VT International Press Ltd., London (UK) यांच्यात सामंजस्य करार

1 min read

कर्जुले हर्या दि.२८:- कर्जुले हर्या (ता.पारनेर) – राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हर्या आणि युनायटेड किंगडममधील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रकाशन संस्था VT International Press Ltd., London (UK) यांच्यात दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत झाला. या कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमध्ये संशोधन, प्रकाशन, शैक्षणिक आदानप्रदान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे हा आहे.या MoU अंतर्गत दोन्ही संस्थांदरम्यान खालील प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत:1.विद्यार्थ्यांचे आणि अध्यापकांचे आंतरराष्ट्रीय ISBN क्रमांकासहित पुस्तक प्रकाशन 2.काँफरन्स प्रोसीडिंग्स प्रकाशनासाठी सहकार्य 3.संयुक्त संशोधन प्रकल्प, रिसर्च पेपर्सचे सहलेखन व प्रकाशन 4.सेमिनार, सिम्पोजियम आणि वर्कशॉप्सचे संयुक्त आयोजन 5.विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे प्रकाशन व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे.
या करारावर VT International Press Ltd., London ,United Kingdom यांच्या वतीने संचालक डॉ. वसूधा के. पवार यांनी स्वाक्षरी केली, तर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राहुलकुमार एस. हिंगोले यांनी स्वाक्षरी करून सहकार्याची अधिकृत घोषणा केली.MoU सोहळ्यास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार, सचिव किरण आहेर, अध्यक्षा मिरा आहेर, CEO डॉ. दीपक आहेर, तसेच खजिनदार बालासाहेब उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अध्यापकवर्गाला आंतरराष्ट्रीय ज्ञानसंपन्न संसाधने, संशोधन प्लॅटफॉर्म, आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असून, महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवे आयाम प्राप्त होणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!