जिल्हा परिषद विश्वासराव मळा शाळेत बाल आनंद मेळावा, आजी आजोबा पूजन व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

1 min read

बेल्हे दि.१८:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विश्वासराव मळा (साकोरी) तालुका जुन्नर येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या वतीने बाल आनंद मेळावा (आठवडे बाजार), आजी आजोबा पूजन व हळदी कुंकू या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांचे व्यावहारिक ज्ञान कौशल्य, सामाजिक संभाषण व आजी आजोबाबदद्ल कृतज्ञता आणि इतर गोष्टींची माहिती व्हावी या अनुषंगाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आनंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांची उलाढाल केली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश विश्वासराव, साकोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा गाडगे आणि समस्थ ग्रामस्थ यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून कार्यक्रमास सुरुवात केली. सर्वांचा या कार्यक्रमास उर्स्फूत प्रतिसाद मिळाला. बाजारामध्ये भाजीपाला, पोहे, मंच्युरियन, इडली इ . आदि बरेच काही मुलांनी आणले होते.शिक्षक सुलभा औटी, सोपान बेलकर यांनी सर्व पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!