आळेफाटा पोलिसांनी विद्यार्थांना दिले रस्ता सुरक्षेचे धडे

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा ता.जुन्नर येथील बी.जे कॉलेज आळे, तसेच ज्ञान मंदिर हायस्कूल आळे शाळेमधील मुलांना शिक्षकांना रस्ता सुरक्षा मोहीम बाबत आळेफाटा पोलिसांनी मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस टीमने कॉलेजमध्ये येताना कोणीही टू व्हीलर तसेच फोर व्हीलर चा वापर करू नये, टू व्हीलर घेऊन आले तर हेल्मेट वापरावे हेल्मेट चे फायदे तोटे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच अठरा वर्षाखालील मुलांनी गाडी चालवली तर तुमच्या पालकांवर कारवाई केली जाईल याबाबत सूचना दिल्या. तसेच कॉलेजमधील शिक्षका ड्युटीवर येताना टू व्हीलर वर येत असतील तर हेल्मेट वापरावे. याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस हवालदार कोकाटे, महीला पोलीस हवालदार दहिफळे, पोलीस मित्र प्रतीक जोरी, मंगेश कदम व टीम उपस्थित होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!