‘नवांकुर 2K26’ : पदविका विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चार दिवसीय इंडक्शन कार्यक्रम
1 min read
बोटा दि.२७:- विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा येथे प्रथम वर्ष पदविका तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका विद्यार्थ्यांसाठी ‘नवांकुर 2K26’ या चार दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. 21 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या संचालक विद्यूलता पाटील, संस्थेचे सेक्रेटरी रामदास पोखरकर आणि संस्थेचे सल्लागार डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी सर्व नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्या निकेतनमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून,
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भविष्यासाठी संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी संस्थेवर विश्वास ठेवून आपल्या ज्ञान, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करावे आणि भविष्यात संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दि.२१ ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज आरतीने झाली. यावेळी संस्थेचे डॉ. राहुल मुळजकर – प्राचार्य, डॉ. प्रशांत फटांगरे – उपप्राचार्य, डॉ. संतोष पवार – संचालक, विद्या निकेतन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स तसेच श्री. लोखंडे – पालक प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नव्याने प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून विभागप्रमुख व प्राध्यापकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ. राहुल मुळजकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना इंडक्शन कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. शालेय शिक्षणातून तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाकडे होत असलेल्या संक्रमणामध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शिस्त,
सातत्यपूर्ण अभ्यास आणि कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून विविध distractions टाळावेत, निरोगी जीवनशैली अंगीकारावी आणि आपल्या शैक्षणिक ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी जबाबदार, कुशल व सक्षम नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. प्रशांत फटांगरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाची व उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती देत शैक्षणिक शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व सांगितले. डॉ. संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व करिअरविषयक संधींबाबत मार्गदर्शन केले.
उद्योग व करिअरविषयक मार्गदर्शन
दुसऱ्या दिवशी, दि. 22 ऑगस्ट रोजी, विद्यार्थ्यांसाठी Student Career Guidance Program तसेच Alumni & Industry Interaction आयोजित करण्यात आला. दिवसाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी मान्यवर अतिथी व विविध विभागांच्या विभागप्रमुखांचा परिचय व सत्कार करण्यात आला.
यामध्ये डॉ. राहुल मुळजकर – प्राचार्य, डॉ. किरण शिंदे – प्राचार्य, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, प्रा. संतोष गोर्डे – विद्या निकेतन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, प्रा. प्रकाश वाकचौरे – Academic Dean व विभागप्रमुख,Mechanical Department तसेच किरण गोखले – Office Superintendent यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवसाचे मुख्य प्रवक्ते प्रा. संतोष गोर्डे यांनी विद्यार्थ्यांना Engineering क्षेत्रातील विविध Career Opportunities, Industry Requirements आणि Entrepreneurship याबाबत मार्गदर्शन केले. Engineering हे निर्मिती, नवकल्पना आणि समस्या सोडविण्याची प्रभावी शक्ती असल्याचे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा ओळखून तांत्रिक ज्ञानासोबत आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे
आवाहन केले.डॉ. किरण शिंदे यांनी सकारात्मक विचारसरणी, निरोगी जीवनशैली आणि शैक्षणिक प्रगती यांचा संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व जबाबदार विद्यार्थी जीवन जगण्याचा संदेश दिला. दिवसाच्या उत्तरार्धात Games & Fun Activities घेण्यात आल्या.
सामाजिक बांधिलकीतून स्वच्छतेचा संदेश
तिसऱ्या दिवशी, दि.२४ ऑगस्ट रोजी, NSS Orientation व Social Awareness अंतर्गत अकलापूर येथील मंदिर परिसरात Swachhata Abhiyan आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर स्वच्छतेत योगदान दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व
समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.यानंतर Scholarship Discussion आणि Examination Pattern Discussion घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, परीक्षा पद्धती, मूल्यमापन प्रक्रिया व शैक्षणिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सांस्कृतिक भेट व समारोप
चौथ्या दिवशी, दि.२५ ऑगस्ट रोजी, विद्यार्थ्यांसाठी बाळेश्वर मंदिराला सांस्कृतिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर Induction Program Valedictory Session द्वारे चार दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. प्रमिला शिंदे व प्रा. सविता बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी प्रा. ज्योती देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांचे आभार मानले.‘नवांकुर 2K26’ हा केवळ नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम न ठरता,
त्यांच्या ज्ञान, शिस्त, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि व्यावसायिक क्षमतेच्या विकासाची भक्कम पायाभरणी करणारा उपक्रम ठरला. विद्या निकेतनमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि भविष्याभिमुख ठरावा, या उद्देशाने संस्थेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच उद्योग क्षेत्राची ओळख,
करिअरच्या विविध संधी, कौशल्य विकास, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम उपलब्ध करून दिले. ‘ज्ञानातून कौशल्याकडे, कौशल्यातून करिअरकडे आणि करिअरमधून विकसित भारताकडे’ या दिशेने ‘नवांकुर 2K26’ विद्यार्थ्यांच्या नव्या प्रवासाची आशादायी सुरुवात ठरली.
