विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बी.ई. व एम.ई. प्रवेशास उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read
बोटा दि.३०:- शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी (B.E.) तसेच पदव्युत्तर अभियांत्रिकी (M.E.) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाविद्यालय हे AICTE, नवी दिल्ली मान्यताप्राप्त, DTE महाराष्ट्र मान्यताप्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड
डेटा सायन्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत.याशिवाय मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (M.E.) अंतर्गत एम.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग (डिझाईन इंजिनिअरिंग),एम.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग (स्ट्रक्चर्स इंजिनिअरिंग)एम.ई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश सुरू आहेत:
एम.ई.मेकॅनिकल इंजिनिअरिंग (डिझाईन इंजिनिअरिंग)एम.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग (स्ट्रक्चर्स इंजिनिअरिंग),एम.ई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एम.ई. प्रवेशासाठी GATE पात्र उमेदवार तसेच प्रायोजित (Sponsored) उमेदवार पात्र असून प्रवेश प्रक्रिया GATE/CAP नियमानुसार राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन, आधुनिक पायाभूत सुविधा तसेच उत्कृष्ट प्लेसमेंटची संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी DTE FC सेंटर क्रमांक 5408 वर विद्यार्थ्यांना पर्याय भरणे, कागदपत्र पडताळणी व प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा पर्याय निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल मुळजकर यांनी विद्यार्थी व पालकांना आवाहन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, संशोधना भिमुख वातावरण आणि उद्योगस्नेही कौशल्ये ही काळाची गरज आहे.
विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी बी.ई. तसेच एम.ई. प्रवेश प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
