सप्तशोधक बहुजन आघाडीच्या वतीने संविधान प्रत वाटप
1 min read
बेल्हे दि.२८:- संविधान दिनानिमित्त जुन्नर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भेट देण्यात आली. यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष उत्तम वायदंडे, मनेश अल्हाट, रामभाऊ खंडागळे, कैलास बोबाटे, राहुल गायकवाड, रवींद्र साळवे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रत जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके, डीवायएसपी पाटील, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पीआय विश्वास जाधव, गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावर, पुरवठा विभागाचे ज्ञानेश कुलकर्णी, समाज कल्याण विभाग पंचायत समितीचे शंकर भालेराव, प्रभाग समन्वय पंचायत समिती जुन्नरचे रवींद्र आल्हाट,
नळवणे गावचे तलाठी श्यामराव सलामी, हेमंत भागवत, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर आदींना प्रती देण्यात आल्या.अशी माहिती पेमदरा (ता.जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष उत्तम वायदंडे यांनी दिली.
