राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन

1 min read

रानमळा दि.१८:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित दिलीप वळसे पाटील कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे उद्घाटन शनिवार दि.१७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन रानमळा (ता. जुन्नर) येथे करण्यात आले असून शिबिराचा कालावधी १७/०१/२०२६ ते २३/०१/२०२६ असा आहे.उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री साईकृपा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन सावकार पिंगट हे होते. तर श्रामसंस्कार शिबीर उदघाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बी. ओ. एस. मेंबर व नारायणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रिया खिलारी सरपंच शिरोली, रेशमा बोटकर सरपंच पारगाव, सविताताई तिकोणे सरपंच रानमळा, विठ्ठल गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते गुळुंचवाडी समीर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बेल्हे, मा. शांताराम लामखडे सामाजिक कार्यकर्ते झापवाडी, मा. निलेश बांगर सी. ए., दादाभाऊ गुंजाळ, मा. विकास बोटकर, मा.अशोक गुंजाळ, मा. अजितशेठ खिलारी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजना गीताने करण्यात आली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रमसंस्काराचे महत्त्व, स्वयंसेवकांमधील सामाजिक जाणीव, तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व ग्रामविकास याबाबत विचार मांडले. “श्रमातूनच संस्कार घडतात आणि संस्कारातूनच जबाबदार नागरिक निर्माण होतात,” असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.या शिबिराच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती प्रबोधन, वनराई बंधारे, जलव्यवस्थापन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल पडवळ यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी केले व प्रा सुभाष घोडे यांनी आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!