विशाल फार्मसी कॉलेज, आळे येथे पारंपरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

आळे दि.१४:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे येथे पारंपरिक दिन कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा व वेशभूषा सादर करून “विविधतेतील एकता” हा संदेश प्रभावीपणे दिला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बब्रूवाहन रोंगे, संस्थापक श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर, त्यांच्या समवेत डॉ. मिसाळ सर, प्राचार्य श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर हे उपस्थित होते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे विश्वस्त विक्रांत काळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे प्राचार्य –डॉ. एस. एल. जाधव, व्ही जे एस एम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या प्राचार्या डॉ. आर. ए. हांडे,

तसेच सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पारंपरिक दिना निमित्त विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या पारंपरिक पोशाखात सांस्कृतिक नृत्ये, भावपूर्ण सादरीकरणे व राज्य सादरीकरणे सादर केली. प्रत्येक सादरीकरणातून त्या-त्या राज्याची संस्कृती, खाद्यसंस्कृती,

लोककला व परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली. या स्पर्धांचे परीक्षण परीक्षक म्हणून महेंद्र बोऱ्हाडे, पर्यवेक्षक न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोटवडे, भाऊसाहेब खाडे प्राध्यापक चैतन्य विद्यालय, ओतूर व अमोल कापसे प्राध्यापक ज्ञान मंदिर ज्युनिअर कॉलेज, आळे हे लाभले.

राज्य सादरीकरण स्पर्धेत अंतिम वर्ष बी फार्मसी या विद्यार्थ्यांनी केरळ राज्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्याचे प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमात वैयक्तिक पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले. उत्कृष्ट निवेदक –सई बढे, उत्कृष्ट हावभाव– रंजना गौतम, उत्कृष्ट वेशभूषा– दिशा सोनीग्रा यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

परीक्षक महेंद्र बोऱ्हाडे यांनी आपल्या भाषणातून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य, सांस्कृतिक जाणीव व संघभावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक समिती, विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व सर्व सहकाऱ्यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!