पुणे – नाशिक रेल्वे मार्ग अंतिम स्थळ सर्व्हेनुसार संगमनेर – अकोले मार्गेच व्हावा
1 min read
बेल्हे दि.१४:- पुणे – नाशिक रेल्वे मार्ग अंतिम स्थळ सर्व्हेनुसार संगमनेर – अकोले मार्गेच व्हावा, या ठाम मागणीसाठी बोटा येथे रेल्वे कृती समिती, विकास क्रांती सेना व रुद्रशंभू फाउंडेशन यांच्या वतीने पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको जनआंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना महायुतीच्या वतीने नीलम खताळ पाटील यांनी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलनकर्त्यांच्या भावना व मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.
यावेळी नामदार विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शिष्टमंडळाची भेट घडवून देण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या आश्वासनानंतर सदर आंदोलनाचा शांततेत समारोप करण्यात आला.नामदार विखे पाटील साहेबांना केंद्रीय रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची ग्वाही देखील दिली आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेर – अकोले मार्गेच गेला पाहिजे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे.
