देहू ते ओतूर पायी दिंडी सोहळ्याचे २५ जानेवारीला प्रस्थान
1 min read
ओतूर दि.१४:- माघ शुद्ध दशमी निमित्त देहू ते ओतूर दरम्यान सद्गुरु भेट पायी दिंडी पालखी सोहळा आयोजीत केले आहे. 25 जानेवारीला देहू ओतुर कडे प्रस्थान होणार आहे 28 जानेवारीला पालखी सोहळा ओतूर येथे श्री सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज मंदिरात पोहोचणार आहे.
संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस माघ शुद्ध दशमीच्या पर्वावर देहूतून सद्गुरु भेट पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थांच्या सहकार्याने शिव चिदंबर सेवा समिती आयोजन करते.
परमपूज्य उमाकांत भाऊ कुलकर्णी व वंदनीय ताईंच्या मार्गदर्शनातून यंदा 25 जानेवारीला पालखीचे प्रस्थान देहूतून सकाळी आठ वाजता ओतूर कडे होणार बहुसंख्येने वारकऱ्यांनी उपस्थित रहावे अशी माहिती वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप रामदास महाराज मोरे यांनी दिली.
