आळे गावच्या उपसरपंच पदी जयश्री डावखर यांची बिनविरोध निवड; गावच्या पहिल्या महिला उपसरपंच होण्याचा मिळाला मान
आळे दि.१४ – आळे गावच्या उपसरपंच पदी जयश्री सागर डावखर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा आळे गावचे सरपंच सखाराम (मुकुंद) भंडलकर व ग्रामविकास अधिकारी वनघरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार झाली.उपसरपंच पदासाठी जयश्री डावखर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व आळे गावचे माजी सरपंच प्रितम काळे, माजी उपसरपंच विजय कुऱ्हाडे, माजी सरपंच सविता भुजबळ, माजी उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय नाना कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव लाड,दिगंबर घोडेकर,
सुधाकर काळे, रज्जाउद्दीन मोमीन, ग्रामपंचायत सदस्या मंगल तितर, लता वाव्हळ, गौरी भंडलकर, सोनाली वाघुले, उर्मिला कुऱ्हाडे,ज्योती शिंदे, अर्चना गुंजाळ, सागर डावखर आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद इतर ग्रामस्थ उपस्थित होते. जयश्री डावखर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
