बेल्ह्यात आदर्श क्रांतिकारी महिला सन्मान मेळावा संपन्न

1 min read

बेल्हे दि.१४:- सारनाथ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बेल्हे (ता.जुन्नर) येथे आदर्श क्रांतिकारी महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आपल्या देशातील बऱ्याचश्या समाजातील महिलांचे अजूनही सबलीकरण सक्षमीकरण झाले नाही. काही समाजातील महिला निरक्षर असल्या कारणाने अजूनही अंधश्रद्धा रूढी परंपरेने आपले जीवन जगत आहेत. भारतातील अनेक आदर्श क्रांतिकारी महिलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समाजासाठी व्यतित करून एक आदर्श देश घडविण्याचे काम केले आहे. त्यामध्ये राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर, रजिया सुलतान, स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले, माता भिमाई, त्याग मूर्ती माता रमाई, सरोजिनी नायडू, मदर तेरेसा, फातिमा शेख, मुक्ता साळवे, सिंधुताई सकपाळ, इंदिरा गांधी यांच्या ऐतिहासिक कार्याचे प्रबोधन महिलांना व्हावे. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महिला सन्मान मिळवण्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी महिलांचे आजार व त्यावर योग्य उपचार मार्गदर्शन महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन या कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुणे मार्गदर्शक उपस्थित होते. जुन्नर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगराध्यक्ष अलका शिवाजी फुलपगार दर्श एनर्जी फीड्स एज्युकेशन फायनान्शिअल कंपनीच्या डायरेक्टर प्राणाया विनय राऊत, बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा जानकु डावखर, महिला आरोग्य मार्गदर्शक डॉ.कविता खेडकर, डॉ. अविनाश खेडकर, साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत जगताप, सचिव राकेश डोळस, दर्श सन लाईटचे

डायरेक्टर डॉ. विनय राऊत, भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष नितीन साळवे, सरचिटणीस यशवंत गायकवाड कोषाध्यक्ष विजय वाघमारे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यिक ख. रा माळवे अभिनेत्री अलका जोगदंड दूरदर्शन निवेदिका सुनैना चाळके अभिनेत्री पत्रकार सुशील मोरे डॉ. पालवे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन बचत गटाच्या अध्यक्ष जमिनी शेख, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेचे अध्यक्ष उषा डोळस, ताहेर शेख, कमलेश डोळस यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा बेल्हे की जि एन महिला बचत गट संपूर्ण महिला यांचे विशेष सौजन्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!