बारामतीत AI सेंटर चालू
1 min read
बारामती दि.३०:- बारामती येथे गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान बारामती येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,
रोहित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी देखील या कार्यक्रमासाठी बारामतीत आल्या होत्या.कार्यक्रमापूर्वी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे बारामती विमानतळावर आगमन झाले, जिथे अजित पवार आणि रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत त्यांना विद्या प्रतिष्ठानकडे आणले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यासोबत संपूर्ण सेंटरची पाहणी केली.
