तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, भाजपाची मुंबईसाठीची पहिली यादी जाहीर; ६६ उमेदवारांचा समावेश!

1 min read

मुंबई दि.३०:- मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२६ साठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जात असताना दुसरीकडे राज्यातला सवतासुभा मोडून भाजपा-शिंदेंची शिवसेना यांच्यापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फारकत घेतली आहे. मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवत असून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र त्यांनी थेट मूळ पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. यात आता भारतीय दनता पक्षानं मुंबई महानगर पालिके साठीच्या ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.कधी आहेत मुंबई महानगर पालिका निवडणुका?गेल्या पाच वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका अखेर पुढच्या महिन्यात होऊ घातल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत महायुतीमधील मित्रपक्षांचा वरचष्मा पाहायला मिळाला. आता पुढच्या महिन्यात १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यभरातल्या २९ महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!