कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर ट्रक व मजुरांच्या पिकअपचा भीषण अपघात; २ ठार, १५ ते २० जखमी

1 min read

ओतूर दि.३०:- पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर कल्याण महामार्गांवरील डुंबरवाडी गावच्या हॉटेल अभिजित जवळ ओतूरकडून आळेफाटा दिशेने जाणारी मजुरांचे पीकअप वाहन आणी आळेफाटा दिशेकडून ओतूर दिशेने जाणारा ट्रक यांचा समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवार दिनांक, 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात अंदाजे पंधरा ते विस जण गंभीर जखमी झाले असून दोन जण मयत झाले असून एक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणी डुंबरवाडी टोल नाक्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते. या अपघातातील जखमींना ओतूर आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महामार्ग प्रशासनाने अपघातातील वाहने रस्त्यावरून बाजूला करत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!