राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
1 min read
कर्जुले हर्या दि.२८:- राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हर्या येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. राहुलकुमार हिंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली.
या विशेष प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार, महाविद्यालयाचे सेक्रेटरी किरण आहेर, अध्यक्षा मीरा आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक आहेर, तसेच खजिनदार मा. बाळासाहेब उंडे उपस्थित होते. मान्यवरांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेवर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर आणि भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी विद्यार्थ्यांनी कर्तव्यनिष्ठ राहण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला.विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली.
संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, तसेच संविधान जनजागृतीसंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय होता.
कार्यक्रमाचे संयोजन आयक्यूएसी समिती, विद्यार्थी विकास विभाग आणि विविध विभागप्रमुखांनी केले. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम भव्य, शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरला.
