लाखणगावात संविधान दिन उत्साहात साजरा

1 min read

लाखणगाव दि.२७:- ग्रामपंचायत लाखणगाव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान भवन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, न्यू इंग्लिश स्कूल व जि प प्राथमिक शाळा लाखणगाव च्या वतिने भारतीय संविधानचा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मौजे लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील संविधान स्तंभाच्या आवारात आकर्षक फुलांनी सजविलेक्या स्तंभाला मानवंदना देण्यात आली.लाखणगावातून संविधान सन्मान रैली काढण्यात आली. भारतीय संविधानाच्या विजयाच्या घोषणा देत संविधान सन्मान रैली संविधान स्तंभा जवळ येऊन संविधान स्तंभाला मानवंदना देऊन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सामूहिक संविधान उद्देदेशिकेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेत्या पूर्वाताई वळसे पाटील तर प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील स्मारक समिती चे अध्यक्ष गौतमराव खरात, पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अर्चनाताई कोल्हे मुख्याध्यापक अनिल देसले, ग्रामसेवक निखार भाऊसाहेब, संचालिका मायाताई देठे, कविताताई खरात सुवर्णाताई रोकडे सीमाताई उघडे सविताताई टिंगरे शेतमाल प्रक्रिया अध्यक्ष सतीश रोडे, सरपंच प्राजक्ता रोडे ,सचिव प्रकाश सोनवणे, गौतम रोकडे विठ्ठल टिंगरे रावि फाले खंडू थोरात एकनाथ वाव्हळ नवीन सोनवणे संतोष अस्वारे ज्ञानेश्वर अस्वारे अंकिता वाळुंज शिरीष रोडे दस्तगीर मुजावर दीपक वारे सतीश वारे अशोक वारे मनोज थोरात सुनील अंकुश आदि मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध व्याख्याते सुधाकर अभंग यांनी संविधान जागृती काळाची गरज या विषयावर व्याख्यान दिले, तर आंबेगाव तालुक्यात घोडेगाव येथे तहसील कार्यालय च्या आवारात भव्य संविधान स्तंभ उभरावा अशी मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष यांनी केली. पूर्वताई वळसे पाटील यांनी जसे आपण मंदिरात देवदर्शन दररोज घेतो तसे संविधान स्तंभाचे दर्शन दररोज सर्वांनी घेतले पाहिजे आणि तसे आचरण केले पाहिजे असं विशेष आव्हान सर्वांना केले. तर लाखवगाव मधील संविधान स्तंभ चा कार्यक्रम दरवर्षी शासनाच्या स्तरावर व्हावा अशीही मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मा उपाध्यक्ष यांनी या पुढील काळात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये संविधान स्तंभाची उभारणी केली जाईल तर अध्यक्षीय भाषणात मा पुर्वाताई यांनी भारतीय संविधान जगात श्रेष्ठ असून ते भारतीय नागरिकांच्या घराघरात असले पाहिजे संविधान हा राष्ट्रग्रंथ असून त्याचा सन्मान आणि त्याच्या मूल्याची जोपासना झाली पाहिजे.
प्रस्तावित प्रकाश सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन विठ्ठल टिंगरे यांनी केले तर आभार गौतमराव रोकडे यांनी मानले. संविधान उद्देशिकेचे वाचन मुख्याध्यापक अनिल देसले यांनी केले. उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांना राज्यघटनेच्या प्रती देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!