शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल
1 min read
मुंबई दि.२८:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
आता ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
