बिबट्याच्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार
1 min read
आणे दि.२१:- आणे येथील संभेराव वस्तीकडे जाणाऱ्या रस्तावर जांभळदरा येथे भरदिवसा बिबट्याने वासरावर हल्ला करून सुशांत दाते यांच्या जराशी वासराला ठार केले. मंगळवार दि.१८ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सायंकाळी जनावरे घरी नेत असताना मागे राहिलेल्या वासरावर बिबट्याने झडप घातली व आपली शिकार बनवली. सोमवार दि.१७ रोजी याच भागात एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला गंभीर जखमी केले.
वस्तीवरील नागरिकांना कळवून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना गावच्या सरपंच प्रियांका दाते, उपसरपंच सुहास आहेर यांनी नागरिकांना दिल्या.
