बोरी बु.- खोडद गटासाठी २ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर:- पांडुरंग पवार

1 min read

निमगाव सावा दि.२१:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून बोरी बुद्रुक- खोडद जिल्हा परिषद गटासाठी २ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये 1) खोडद – माळी मळा सामाजिक सभागृह – 15 लक्ष रु., 2) निमगांव सावा – वरद विनायक मंदिर सभागृह बांधणे:- 10 लक्ष रु., 3) नगदवाडी (कांदळी)- श्री हनुमान मंदिर सांस्कृतिक भवन – 10 लक्ष रु., 4) पारगांव तर्फे आळे – श्री हनुमान सामाजिक सभागृह – 10 लक्ष रु., 5) औरंगपूर – श्री हनुमान सामाजिक सभागृह – 40 लक्ष रु.,6) वडगांव कांदळी- लांडगे मळा सामाजिक सभागृह – 15 लक्ष रु. 7) खोडद – सुतारआळी श्री हनुमान सभागृह- 10 लक्ष रु. 8) औरंगपूर- श्रीराम मंदिर सभागृह पटवाडी- 10 लक्ष रु. 9) निमगांव सावा – घोडे मळा सांस्कृतिक भवन- 20 लक्ष रु. 10) बोरी बु || – माळवाडी सामाजिक सभागृह- 15 लक्ष रु.11) शिरोली तर्फे आळे – श्रीराम सामाजिक सभागृह – 15 लक्ष रु.12) निमगांव सावा – ग्रामपंचायत कार्यालय रंगकाम व किरकोळ दुरुस्ती- 10 लक्ष रु.13) रानमळा – ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती – 5 लक्ष रु.14) निमगांव सावा – कारवाडी शहाबुद्दीन वली बाबा सभागृह – 10 लक्ष रु. 15) बोरी खु || – श्री हनुमान सभागृह गावठाण – 10 लक्ष रु. अशी कामे मंजूर आहेत.या कामासाठी एकूण 2 कोटी 5 लक्ष निधी मंजूर झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!