पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही कधीतरी आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची:- अजित पवार
1 min read
पुणे दि.१२:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही कधीतरी आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची. आमच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला थारा दिला नाही, नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिलं आणि स्मशानभूमी, दफनभूमी, रस्ते, पूल, उद्योग-धंदे उभे करून विकास करून दाखवला.
पण २०१७ नंतरच्या काळात शहराची दिशा भरकटली. प्रचंड भ्रष्टाचार, बोगस कामकाज, वाढतं प्रदूषण, ट्रॅफिकची कोंडी, खड्ड्यांचं साम्राज्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा बिघाड शहराला पोखरून काढत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. २ मधील
अधिकृत उमेदवार श्री. आल्हाट रूपाली परशुराम, श्रीम. अश्विनी संतोष जाधव, श्री. विशाल विलास आहेर, श्री.वसंत प्रभाकर बोराटे तसंच प्रभाग क्र. ३ मधील अधिकृत उमेदवार सौ. अनुराधा दीपक साळुंके, श्री. प्रकाश बबन आल्हाट, सौ. पुनम अमित तापकीर, श्री. लक्ष्मणशेठ सोपानराव सस्ते पा. यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
आज शहरावर कर्जाचा बोजा आहे, मोशी-चिखलीसारखे भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अल्पवयीन गुन्हेगारीनं दहशत निर्माण केली आहे. हे चित्र बदलायचं असेल तर प्रामाणिक काम करणाऱ्या आणि महापुरुषांच्या विचारधारेनं चालणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यावी लागेल.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालून, सर्व जाती-धर्माचा सन्मान राखून आम्ही कामं केली. आता आम्ही जाहीर केलेल्या सुधारणा करून दाखवणार. दररोज नळाद्वारे पाणी आणि टँकर माफियाला पूर्णविराम, ट्रॅफिक व खड्डेमुक्त पिंपरी-चिंचवड, नियमित व पारदर्शक स्वच्छता व्यवस्था,
हायटेक आरोग्य सुविधा आणि PMPML व मेट्रोसह मोफत आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक, पारदर्शक टेंडर प्रक्रिया, स्वच्छ कारभार आणि नियोजनबद्ध विकासातून पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा ‘बेस्ट शहर’ म्हणून नावलौकिक मिळवून द्यायचं आहे.
त्याकरता येत्या १५ जानेवारीला प्रभाग क्र. २ आणि ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
