विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट मध्ये राजमाता जिजाऊ यांची 428 सावी व स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती साजरी

1 min read

बोटा दि.१२:- विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संचलित विद्यानिकेतन कॉलेज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बोटा (ता.संगमनेर) येथे राजमाता जिजाऊ यांची 428 सावी व स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. प्रशांत फटांगरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्युलता पाटील त्याचबरोबर मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख वाकचौरे त्याचबरोबर विद्युत विभागाचे प्रमुख दिघे त्याचबरोबर सहाय्यक प्राध्यापक देशमुख सर त्याचबरोबर दूरसंचार विभागाचे प्रमुख बोरकर मॅडम त्याचबरोबर आयटीआय कॉलेजचे प्राचार्य ए बी अभंग सर त्याचबरोबर संस्थेचे शिक्षक वृंद उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र आत्मसात करून जीवनाचे मूल्य आचरणात आणावी असे मार्गदर्शन संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.ए फटांगरे यांनी केले. त्याचबरोबर युवकांसाठी नेहमी प्रेरणादायी असणारे व अखंड हिंदुस्तानात नवयुवकांसाठी त्यांच्या विचारांची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद हे देखील युवकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यामध्ये त्यांचे विचारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.ए फटांगरे सर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!