वळसे पाटील महाविद्यालयात पर्यावरण संवर्धन कार्यशाळा
1 min read
निमगाव सावा दि.१२:- निमगाव सावा (ता. जुन्नर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित, दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत ‘पर्यावरण संवर्धन ‘ या विषयावर जिल्हास्तरीय एक दिवसीय मूल्यशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व विद्यापीठ गीत गायनाने आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा धिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविकात या कार्यशाळेचा उद्देश पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती,
सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे व मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करणे हा असल्याचे सांगितले. बी .डी काळे महाविद्यालय घोडेगाव येथील डॉ.गुलाबराव पारखे यांनी रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या स्पष्ट करत
“निसर्गाचे रक्षण” म्हणजेच आपल्या भविष्य साठीची गुंतवणूक आहे असे मत मांडले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात पर्यावरण पूरक सवयी अंगी करण्याचे आव्हान केले. युवकांची पर्यावरण चळवळीतील भूमिका अधोरेखित करत वृक्ष लागवड व जनजागृतीचे महत्त्व सांगितले.
त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर , कचरा व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथील डॉ.निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा व योगदान द्या, निसर्ग वाचला तर माणूस वाचेल असे सांगितले.
पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये पर्यावरण संवर्धनावर प्रतिज्ञा घेण्यात आली.या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, बी.डी काळे महाविद्यालय घोडेगाव येथील डॉ.माणिक बोऱ्हाडे व रा.से.यो. स्वयंसेवक,
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथील उपप्राचार्य के .डी सोनवणे, प्रा. जनार्दन नाडेकर, डॉ. आर. एन गोपाळे व रा. से. यो. स्वयंसेवक, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील रा. से. यो.स्वयंसेवक, डी.जे वळसे कॉलेज शिंगवे पारगाव येथील रा.से.यो.स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवीण गोरडे,
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु.मयूर डुकरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र संयोजक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख
प्रा. अनिल पडवळ यांनी केले,तर आभार पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य आकाश धुमाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.
