जिल्हा परिषद शाळा लवणवाडी आनंदी बाजारात २५ हजार रुपयांची उलाढाल

1 min read

आळे दि.१२:- जि.प.प्राथमिक शाळा लवणवाडी (आळे)येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या वतीने बाल आनंद मेळावा (आठवडे बाजार) भरविण्यात आला होता. मुलांचे व्यावहारिक ज्ञान कौशल्य, सामाजिक संभाषण आणि इतर गोष्टींची माहिती व्हावी या अनुषंगाने दरवर्षी हा आठवडे बाजार भरविला जातो. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरव कोकणे आणि समस्थ ग्रामस्थ यांनी, शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून बाजारास सुरवात केली.सर्वांचा या कार्यक्रमास उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारमध्ये भाजीपाला, कडधान्य, किराणा, पावभाजी, वडापाव, इडली, ढोकळा, चहा इ.आणि बरेच काही मुलांनी आणले होते. बाजाराची एकूण उलाढाल रू.२५००० रुपयांची झाली.
शिक्षक नितीन कोकतरे, दिलीप साबळे यांनी सर्व पालक, ग्रामस्थ, आणि मान्यवरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!