निमगाव सावा मध्ये श्री गणेश जयंती उत्सवानिमित अखंड हरीनाम सप्ताह
1 min read
निमगाव सावा दि.१२:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील शिरोलीवाट मळ्यातील श्री गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त १६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त विविध कीर्तनकार महाराजांचे कीर्तन सेवा येथे आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.१६) हभप. अर्जुन महाराज साळुंके, शनिवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.१७) हभप. महेश महाराज मडके, रविवारी दुपारी ३ ते ५ पर्यंत (दि.१८) हभप. निवृत्ती महाराज देशमुख, सोमवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.१९) हभप. योगीराज महाराज गोसावी,
मंगळवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.२०) हभप. कृष्णाजी महाराज चवरे, बुधवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.२१) हभप.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवारी सकाळी १० ते १२ पर्यंत (दि.२२) हभप. गणेश महाराज जगताप, गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत (दि.२२) गोरक्षनाथ महाराज उदागे यांची कीर्तनसेवा होणार असून
शुक्रवारी सकाळी १० ते १२ पर्यंत (दि.२३) पोपट महाराज कासारखेडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.पहाटे ४ ते ६ काकड आरती, रोज सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन ९ नंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत.या मंदिरातील गणेशमूर्ती स्वयंभू आहे.
ही मूर्ती अंदाजे १०० ते १५० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. गणपतीची ही मूर्ती उजव्या सोंडेची असून शास्त्रात उजव्या सोंडेच्या गणपतीला ‘सिद्धिविनायक’ म्हटले जाते, जे अत्यंत प्रभावी आणि कडक मानले जातात.सुरुवातीच्या काळात या मूर्तीची पूजा एका व्यक्तीने मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या बाजूला केली होती.
अनेक वर्षे ही मूर्ती तिथेच विसावलेली होती.१९९३ साली परिसरातील सर्व भाविक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून या ठिकाणी एका सुंदर मंदिराची उभारणी केली.प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली.या गणपतीला ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ओळखले जाते.
दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.विशेषत संकष्टी चतुर्थी, अंगारकी आणि गणेशोत्सवाच्या काळात येथे भव्य असा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे निमगाव सावा आणि शिरोली परिसरातील हे एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनले असल्याचे देवस्थानचे पुजारी जनार्दन काटे, स्थानिक ग्रामस्थ कडुन सांगण्यात येत आहे यांनी सांगितले.
