ग्रामीण-निमशहरी नागरिकांसाठी वरदान ठरतंय ‘हे’ उपजिल्हा रुग्णालय
1 min read
पुणे दि.३०:- केंद्र व राज्य शासनातर्फे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शहरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांला गुणात्मक प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येतात.
तसेच सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. आरोग्याप्रती समाजाचे ज्ञान, दृष्टिकोन व वर्तणूक सुधारण्यासाठी माहिती, आरोग्य शिक्षण देणे व चांगल्या संवादाद्वारे लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
आजच्या आधुनिक काळात सर्व स्तरावरील नागरिकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचे महत्वाचे कार्य विभाग करीत आहेत. आरोग्य योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवांची आखणी करून त्या लोकसहभागाद्वारे लोकाभिमुख करण्यासाठी जनसहभाग हा अत्यंत मोलाचा ठरतो आणि त्यावरच योजनांचे यश अवलंबून असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्याला महत्त्वाचे स्थान असून आरोग्य हीच संपत्ती या असा वाक्यप्रचारही प्रचलित आहे. व्यक्तिगत कौटुंबिक समाज देशाच्या प्रगतीसाठी आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून निरोगी आरोग्यासाठी संवर्धनासाठी तसेच वैद्यकीय सेवा उपचाराकरितासाठी आरोग्यदायी योजनांची अंमलबजावणी करणे.
हे शासनाचे कर्तव्यच आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने वर्षभरात ७९ हजारांहून अधिक रुग्णसेवा प्रदान केल्या आहेत, आरोग्यविषयक सेवांच्या माध्यमातून इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण-निमशहरी नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील आरोग्य विषयक सेवांचा आलेख या लेखाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य उपसंचालक डॉ.भगवान पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात यावर्षी बाह्यरुग्ण विभागाअंतर्गत ७५ हजार ९७९ रुग्णसेवा आणि अंतररुग्ण विभागाअंतर्गत ३ हजार १०५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
या वर्षांमध्ये साधारणत: अस्थिरोग विभागात सांधेरोपण शस्त्रक्रिया मोडलेल्या हाडावर प्लास्टर प्लेट बसवणे स्क्रू बसवणे आदी ४२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. स्त्रीरोग विभागाअंतर्गत गरोदर मातांची तपासणी प्रसूतीपूर्व व प्रसुती पाश्चात्य उपचार तसेच गरजेनुसार रक्त पुरवठा किंवा रक्त वाढीचे सलाईन देणे.
साध्यापद्धतीने प्रसुती (नॉर्मल डिलिव्हरी) सिझरियनपद्धतीने ३८२ प्रसुती मूलबंद शस्त्रक्रिया गर्भपात गरोदर मातांची सोनोग्राफी १ हजार ४६० बाहेरील स्त्रोतद्वारे बाळाच्या व्यंगाची सोनोग्राफी कर्करोगाच्या अनुषंगाने गर्भपिशवीच्या मुख स्तन कर्करोग तपासणी व बायोप्सी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
बालरोग विभागात सर्व लसीकरण कावीळग्रस्त बालकांवर फोटोथेरपी तसेच नवजात बाळांवर उपचार व तात्काळ व्यंगनिदान अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल तसेच विविध गाठी काढणे अशा ३१ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी बाह्य वैद्यकीय तज्ज्ञ बोलवून किंवा त्याची शस्त्रक्रियेसाठी मदत घेतली जाते.
कान-नाक-घसा विभागाअंतर्गत त्यासंबंधी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयामध्ये वेळोवेळी डोळे तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया ४२२ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्ण तपासणी व औषधोपचार करण्यात येते.
अति दक्षता विभागात सर्पदंश विविध विष प्राशन केलेल्यांवर उपचार लकवा मारणे उच्च रक्तदाब मधुमेह उपचार छाती व पोटातील पाणी काढणे ऑक्सिजन पुरवठा आदी सर्वप्रकारचे उपचार केले जातात. रुग्णालयामध्ये वृत्त तपासणी व महालॅबअंतर्गत रक्ताच्या तपासणी, कर्करोग निदान थायरॉईड तपासणीसह तपासण्या केल्या जातात.
क्षयरोग तपासणीसाठी थुंकी तपासणी व रक्त तपासणी करुन पुढील उपचार करण्यात येतात. दंतरोग विभागा उपचार करण्यात येते एड्स आजाराची तपासणी व उपचार चालू आहेत.क्रसना डायग्नोस्टिकअंतर्गत २४ तास सर्व प्रकारचे सिटीस्कॅन ८ हजार ८२० मोफत तसेच एक्स-रे २४ तास मशीन सुरु असून ७ हजार ५७७ एक्स-रे काढण्यात येते.
रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागांमध्ये अपघाग्रस्त कुत्रा चावलेले सर्पदंश ईसीजी आदी अत्यावश्यक सेवा पुरविल्या जातात. २४ तास पोस्टमार्टम सुविधा असून वर्षभरात ९३ मयत व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात आले आहेत. याबरोबरच रुग्णालयामध्ये २०२३ पासून जन्म मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी दिव्यांगत्व तपासणी व प्रमाणपत्र देण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत १० रुग्णांना डायलेसिसची सेवा देण्यात आली. आगामी काळात पात्र लाभार्थ्यांना सेवा देण्यावर भर आहे. रुग्णालयामध्ये राज्य शासनाची १०८ व १०२ रुग्णवाहिकाची मोफत सेवा मध्यवर्ती ऑक्सिजन लाईन सक्शन लाईन
मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लेबर रुमची सुविधा, फायर सिस्टीम रुग्णांसाठी २४ तास गरम पाणी तसेच पिण्याची पाण्याची सोय शविच्छेदन कक्ष शवागाराची सेवा मोफत पुरवल्या जातात.डॉ. सिद्धार्थ नामपल्ले, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण व निमशहरी भागातील गोरगरिब नागरिकांकरिता वरदान ठरत
असलेल्या उपजिल्हा रुग्णालय इंदापूर हे वैद्यकीय क्षेत्रात इंदापूर व आसपासच्या भागात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. रुग्णालयात आरोग्यविषयक सुविधा मिळत असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
