धोकादायक ऊस वाहतूक केल्यास होणार कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
1 min read
अहिल्यानगर दि.३०:- जिल्ह्यात ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे, रस्त्याच्या मधोमध वाहने चालवणे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आता महागात पडणार आहे.बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि निरीक्षणे:
🛑 कठोर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश आरटीओ (RTO) आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.🚜 अतिभार (Overloading) : ग्रामीण रस्त्यांची क्षमता १२-१५ टन असताना ५० टनांपर्यंत वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल.
🔊 म्युझिक सिस्टिम: ट्रॅक्टरमधील मोठ्या आवाजातील म्युझिक सिस्टिममुळे हॉर्न ऐकू न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना.⚠️ दुचाकीस्वारांची सुरक्षा : ट्रॉलीच्या बाहेर आलेली उसाची कांडके आणि रस्त्यावर पडलेला ऊस यामुळे दुचाकीस्वारांचे होणारे अपघात गंभीर चिंतेचा विषय आहे.
रस्त्यावर सुरक्षितता पाळा आणि धोकादायक वाहतूक निदर्शनास आल्यास प्रशासनाला सहकार्य करा. मानवी जीव महत्त्वाचे आहे, नियमांचे पालन करा.
