श्रीराम विद्यालयाचा चित्रकला परीक्षेचा निकाल 100 टक्के; ‘अ’ श्रेणीत 6 तर ‘ब’ श्रेणीत 16 विद्यार्थी

1 min read

मंचर दि.१५:- रयत शिक्षण संस्थेचे, श्रीराम विद्यालय पिंपळगाव (खडकी) तालुका – आंबेगाव या विद्यालयाचा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा व इलेमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून एकूण 65 विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ट झाले होते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक फापाळे डी.पी. यांनी दिली.दुर्वा विनोद पोखरकर, सानवी भरत कुरकुटे, स्मृती पंडित इंदोरे, अनुष्का नितीन पोखरकर, सृष्टी गणेश बारवकर, शुभदा संतोष बोंबले या 6 विद्यार्थिंनी ‘अ’ श्रेणीत तर अनुष्का विलास पोखरकर, धनश्री सुनील पोखरकर, श्रावणी सखाराम नवले, सिद्धी ठकसेन अरगडे, स्वरा दत्तात्रय बांगर, तनुजा वैभव भागवत, युवराज पंढरीनाथ मनकर, अक्षरा प्रकाश कामठे, नुपूर अजित दवगे, ओवी गणेश बांगर, पूर्वा अनिल अरगडे, समृद्धी उत्तम गोसावी, सानिका श्याम पोखरकर, त्रिवेणी कृष्णाजी पोखरकर, वेदिका बाळासाहेब पोखरकर, स्वरा अरविंद तांबडे हे 16 विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत तर उर्वरित 43 विद्यार्थी ‘क ‘ श्रेणीत उत्तीर्ण झाले. चित्रकला शिक्षिका सुमती राजगुरू यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. इयत्ता 10 वी च्या परीक्षेला या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील श्रेणीनुसार लाभ मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!