विघ्नहर सुपर मार्केटच्या भाग्यवान विजेत्यांना गोल्ड वाटप
1 min read
आळेफाटा दि.२९:- जुन्नर तालुक्यात नंबर एक असणाऱ्या आळेफाटा येथील विघ्नहर सुपर मार्केटच्या दिवाळी स्पेशल ऑफर चा लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभ आळेफाटा येथे विघ्नहर सुपर मार्केट मध्ये शनिवार दि.27 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
यामध्ये पहिले बक्षीस ५ ग्रॅम गोल्ड कॉइल पिंपळवंडी गावच्या अंकिता सोनवणे यांना मिळाले, दुसरे बक्षीस ३ ग्रॅम गोल्ड कॉईल आळे गावचे नीरज आंधळे यांना तर तिसरे बक्षीस शंकर गाडेकर, धनंजय जनथार, प्रियंका भुजबळ या ३ भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक ग्रॅम गोल्ड कॉईन मिळाले.
तर चौथी बक्षीस 11 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी दहा ग्रॅम सिल्वर कॉइन चे बक्षीस देण्यात आले. तसेच विघ्नहर सुपर मार्केटच्या वतीने 21 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी 555 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके,
पिंपळवंडी गावच्या सरपंच मेघा काकडे, उपसरपंच मयूर पवार, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, यांसह अनेक मान्यवर तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार विघ्नहर सुपर मार्केटच्या वतीने शुभम ढमाले व ढमाले परिवाराच्या वतीने मानण्यात आले. यावेळी आमदार शरद सोनवणे बोलताना म्हणाली की,
आळेफाटा शहर हे दिवसेंदिवस भरभराटीला येत असून विघ्नहर सुपर मार्केटच्या माध्यमातून ग्राहकांना ग्रहउपयोगी वस्तू ची व किराणा खरेदीसाठी करण सोपं झालं आहे. विघ्नहर सुपर मार्केटच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच किराणा मिळत असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साहित्य व किराणा असल्याने ग्राहकांच्या पसंतीला विघ्नहर सुपर मार्केट उतरले आहे.
