समर्थ गुरुकुलमध्ये ‘आनंद बाजार’; व्यवहारातील कौशल्य आणि कल्पकतेचा अनोखा संगम म्हणजे आनंद बाजार:- स्नेहल शेळके

1 min read

बेल्हे दि.२९:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ गुरुकुल बेल्हे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नुकताच आयोजित करण्यात आलेला ‘आनंद बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या आनंद बाजाराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. “मी आणीन–मी मांडीन–आणि मी विक्री करीन अशा प्रकारची टॅगलाईन विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली होती.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे, हस्तकलेच्या वस्तूंचे तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल उभारले होते.काय होता मेळाव्याचा हेतू- मुलांना स्वत:च्या प्रयत्नातून काही तयार करून त्याची किंमत समजणे, विक्री-खरेदीचा प्रत्यक्ष अनुभव मिळवणे, आत्मविश्वास, संवाद,सर्जनशीलता आणि जबाबदारी वाढवणे.आनंद मेळाव्याची वैशिष्ट्ये वस्तूंची विक्री करतील,जसे की–कडधान्याचे पदार्थ, पालेभाज्यांची माहिती,आरोग्यदायी स्नॅक्स,छोटी हस्तकला, क्राफ्ट्स इत्यादी, शिक्षक आणि इतर विद्यार्थी हेच वस्तू विकत घेतील,यातून मुलांना पैशांची देवाण घेवाण, व्यवहार, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि जबाबदारी शिकता येईल.“शिकत-शिकत विक्री अनुभव”-मुलांना छोट्या व्यापाऱ्यासारखे काम करण्याची,किमती ठरवण्याची,ग्राहकांशी बोलण्याची आणि वस्तू सादर करण्याची संधी.या आनंद बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, आत्मविश्वास, संघभावना व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत विक्री, खरेदी,नफा-तोटा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.वेळेवर कमी पडलेले साहित्य आणि त्यावर स्वतःच्या बुद्धीने तसेच ऐनवेळी घेण्यात आलेले निर्णय क्षमता याचे धडे विद्यार्थ्यांना मिळाले.या आनंद बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.आनंद बाजार म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारातून मिळालेल्या कौशल्य व कल्पकतेचा संगम असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!