बुध्दगया एक ऐतिहासिक सहल:-डाॅ खं.र. माळवे-खरमा

1 min read

मुंबई दि.१६:- भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ, सचिव दलितानंद थोरात, पर्यटन उपाध्यक्ष पी.के.पवार, ता.जुन्नर माजी अध्यक्ष राकेश डोळस यांनी आयोजन केले होते.सहल म्हटले की लहानथोरांना आनंदाची मेजवानी मिळणे साहजिकच आहे.सध्याच्या काळात लांबच्या सहलीला जाणे म्हणजे 15 दिवसांची सहल खरं तर तारेवरची कसरत आहे कारण आपण सहलीला जाण्याच्या बातमीपत्र,घटना ऐकतो, शाळेतून सहसा कोणी विद्यार्थी पाठविणे जिकरीचे झाले आहे.तरी भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम यांनी यशस्वीपणे सहल योजली,यांचे श्रेय आयोजकास जाते.एकून सहलीला आयु खंडू माळवे,सौ उषा माळवे,राजकुमार माळवे,बन्सी घायतडके,सौ वनिता घायतडके, बन्सी भोजणे,सिंधू साळवे,सचिन साळवे सौ सोनाली साळवे,सिंधू कडलाक,मारूती फुलपगार,रमेश लवांडे,संजय धोत्रे,सौ वैशाली डोळस,उदय डोळस,रत्नमाला डोळस,कुंदा फुलपगार, रोहिदास सोनवणे,जनाबाई सोनवणे,ताराबाई फुलपगार,प्रकाश कांबळे,सौ शोभा कांबळे,लालू कांबळे,सौ जयश्री कांबळे,उत्तम कांबळे,सौ वंदना कांबळे, शालिनी भालेराव,दिपक कांबळे,सौ चंद्रकला कांबळे, माणिक सावंत,दिपक नितनवरे,श्रीकांत गायकवाड, सौ वंदना गायकवाड,चंद्रसेन गोतारणे, शशिकांत निकाळजे, बाळू गायकवाड,गुलाब गजरमल,दसरथ गायकवाड,विलास यादव,लता कदम,किसन ओव्हाळ,बारकु ओव्हाळ, बबन ओव्हाळ,भिमराव वाघमारे एकून ५३ तसेच जेवणाची उत्तम सोय , आचारी मामा,निलेश ढमाले,उषाताई मोकळे, अधिक उपासक,उपासिका हजर होते.यातच दोन लहान मुलांचाही सामावेश असल्याने आनखिनच वातावरण सुखद वाटत होते. प्रवासात गाणी गोष्टीत रमबान झाले होते. माईक असल्याने अधिक रंगत आली होती १५ दिवस कसे गेले ते कळले नाही कारण पुणे ते दानापुर एक्स्प्रेसने प्रवास करीत मोगलसराई येथे उतरलो सारनाथ मुक्कामी पोहचलो तेथून बुध्दगयाकडे निघालो तेथिल प्रेक्षणिय स्थळे व येथिल संस्कृती दर्शन घेत मुक्कामी एक नवा अनुभव आला.जिल्हा राजगीर डु़ंगेश्वरी पर्वतावर जिथे भगवान गौतमबुद्ध यांनी कठोर तपश्चर्या केली,साधना केली जिथे जिथे मुक्काम केला येथिल अनुभव आनंदायक होता‌ राजगीर मुक्कामी कडाक्याची थंडी असतानाही जानवली नाही. नालंदा वैशाली नगर येथिल दर्शन घेत मुक्काम केला.केशरिया स्तूप दर्शन घेत कुशीनगर प्रवास दर्शन करीत नेपाळकडे रवाना झालो सकाळी संपुर्ण गौतमबुद्ध यांचे जन्मस्थान दर्शन घेत एक वेगळेच अनुभवले प्रत्यक्ष पहाणे व बोलणे यांचा साक्षात्कार झाला श्रावस्तीत प्रत्यक्ष पाहताना नव्या जुन्या बाबींची उजळणी होत होती.लखनौ तर गजबजलेले शहर डॉ बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन स्थळ म्हणजे अंतर्मुख करणारा परिसर आहे. होय नक्कीच सहलीचा आनंद द्विगुणित झाला एकाअर्थानेआल्या जीवनाचे सार्थक झाले असे सहलीला आलेल्यांच्या तोंडून येत होते तसेच सांगता सभारंभी प्रत्येकाने आपले मनोगत सांगताना बहुतेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते.कारण सहलीला जाण्यासाठी ज्या सुविधा हव्यात अशी उत्तम सोय केली होती, होय परतीचा प्रवासही उत्तम झाला १५ दिवस कसे गेले ते कळले सुद्धा नाही असा सुखमय पुण्यभुमीतील बुध्दगया भारतीय जनतेचे प्राणप्रतिष्ठा भूमी आहे पुन्हा पुन्हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा योग येवो हीच एक प्रार्थना

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!