जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करा:- पांडुरंग पवार

1 min read

बेल्हे दि.२१:- वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले यामुळे नागरिक भयभीत झाले असून जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केले आहे.पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड आदि तालुक्यांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे व वारंवार होणा-या हल्ल्यामुळे सर्वत्र घबराट व भितीचे वातावरण आहे. विशेष करुन शालेय विदयार्थ्यांना याचा सामना करावा लागतो आहे. सुरक्षितता म्हणुन इ.१ ली ते इ.१२ वी पर्यंतच्या सर्व शाळांची वेळ बदलुन सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करावी जेणे करुन मुलांना आपल्या भावंडा बरोबर शाळेत जाता व पुन्हा सुरक्षित घरी येता येईल. याबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!