खामगावात १५ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ संपन्न

1 min read

खामगाव दि.५:- जुन्नर तालुक्यातील खामगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. गाव व वाड्या वस्त्यांच्या सर्वांगिण विकासात शाळा, अंतर्गत रस्ते, साकव पुल, स्मशानभूमी शेड, सभामंडप, नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत परिसर विकास, मुख्य रस्ते ई.कामांसाठी एकूण १५ कोटी ३५ लक्ष रू.निधी देऊन ही कामे आता पूर्णत्वास जात आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत महत्वाकांक्षी नळ पाणी पुरवठा योजनेत सोलर प्लांट, जल शुध्दीकरण प्रकल्प तसेच २२ ठाकर कुटुंबांसाठी डोंगरी भागात डांबरी रस्ता आणि गावासोबत वाड्या वस्त्यांवर आजता गायत न झालेल्या. स्मशानभूमीसाठी निधी दिल्याने ही कामे मार्गी लागल्याचे समाधान आहे.कोरोना काळात गावात अत्यंत चांगले नियोजन खामगाव गावाने केल्याची आठवण आमदार बेनके यांना झाली. आमदार अतुल बेनके बोलताना म्हणाले की, छोटे गाव असताना १५०० पेक्षा अधिक ग्रामस्थांची कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून गावच्या लोकांची एकी पाहून भारावून गेले. २०२४ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील आपल्या विचारांचा एक हाती पॅनल निवडून येताना सर्वसामान्य लोक कामाला महत्व देतात. हे अधोरेखित झाले. लोकसभेला देखील या गावाने उच्चांकी मतदान केले होते व विधानसभेला देखील बेनके यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी सभामंडप करण्याची मागणी होती त्याला देखील निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हे काम देखील पूर्णत्वास जाणार आहे. जो विकास कामांचा आराखडा सहकाऱ्यांनी दिला तो पूर्ण केला आहे. खामगाव आणि बेनके कुटुंबाचे नाते हे अत्यंत विश्वासाचे राहिले आहे. माझ्यावर व बेनके कुटुंबावर असलेले ग्रामस्थांचे प्रेम पाहून भारावून गेलो. कार्यक्रम प्रसंगी बैलगाडीतून आमदार बेनके यांची मिरवणूक काढून ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत केले. निवडणुकीच्या प्रचारात या गावचे तरुण अजिंक्य घोलप व ग्रामस्थांना आमदार अतुल बेनके यांनी विकासकामांचा शब्द दिला होता तो पूर्ण केला आल्याचं ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी आमदार अतुल बेनके यांच्या पत्नी गौरी बेनके, सुप्रिया लेंडे, भाऊ देवाडे, ललित जोशी, निलेश रावते, संदीप मुंढे, चंद्रकांत काजळे, कमल शेळकंदे, जलजीवन मिशनचे अधिकारी शेख, जगधने, देवराये, उल्हास भोर, गिरिधर नेहरकर, अतुल घोलप, सागर घोलप, प्रकाश घोलप, संतोष आहेर, उपसरपंच सुरेश काळे, दशरथ आण्णा घोलप, संतोष ढोबळे, मेघनाथ जाधव, संदिप घोलप, अमोल आहेर, सागर पठारे, अमोल पवार, प्रतिभा आहेर, प्रमिला पठारे, सोनल घोलप, उज्वला खंडागळे, कुसुम केदारी, महेश घोलप, सुशांत घोलप, ओंकार घोलप यांसह गावातील इतर महिला, तरुण, ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे