नवरात्रोत्सवात ४०० महिलांना शिंदेवाडी ते मोहटा देवी मोफत दर्शन यात्रा
1 min readशिंदेवाडी दि.७: शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावातील स्त्रीशक्तीला शारदीय नवरात्रोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी ३७५ ते ४०० महिलांना मोफत मोहटा देवी दर्शनासाठी नियोजन करण्यात आले होते.
सर्व माता-भगिनींची विभागवार महिला भगिनींच्या नाव नोंदणी करून ओळख कार्ड देऊन शिंदेवाडी गावठाण (आणे ) येथून ७ लक्झरी बसमधून मोहटा देवी दर्शनासाठी खुप आनंदमय व भक्तीमय वातावरणात मोहटा देवीचे दर्शन घडवले.
या मोहटा देवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके, समर्थ कॉलेजचे वल्लभ शेळके व त्यांच्या समवेत गुळुंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे, सरपंच गुंजाळ, प्रशांत दाते मान्यवर उपस्थित राहिले. त्यांचे शिंदेवाडी गांवचे सरपंच अजित शिंदे, उपसरपंच सुभद्रा किसन शिंदे, मार्गदर्शक लक्ष्मण (अण्णा) यमाजी शिंदे, सामाजीक कार्यकर्ते गोरख धोंडिबा हांडे यांनी आभार मानले. तसेच शिंदेवाडी गावचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने या मोहटा देवी दर्शन यात्रे साठी नियोजन करणाऱ्या महिला प्रतिनिधी, अन्न दान करणारे मान्यवर यांचे आभार मा सरपंच एम.डी.पाटील शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष खंडू बेलकर व्यक्त केले. याप्रसंगी सर्व आजी -माजी पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, ग्रा सदस्य जब्बार शेख, मा उपसरपंच शीतल बेलकर, अविता निकम, अनिता औटी, मा.तंटामुक्ती धोंडिभाऊ शिंदे, देवस्थान विश्वस्त प्रदीप शिंदे, गोरक शिंदे व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित राहून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.