इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांचचा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार

1 min read

आळे दि.९:- इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच आळेफाटा (ता.जुन्नर) चा बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष डॉ. आनंद शेडगे, उद्योजक अतुल कुलकर्णी, इतर मान्यवर बाबु कुऱ्हाडे, एस जी वाव्हळ, गाजरे काका, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच अध्यक्ष डॉ.डी डी गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. बी सी हातपक्की, सहसचिव डॉ. रुपाली हांडे परिषद सदस्य डॉ. एस. एल जाधव, डॉ. एस डी घुले, डॉ. लीना पाठक,प्रा. अनुराधा ताजवे प्रा. विनय साळुंखे, प्रा. देशमुख व विशाल हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. डॉ. आनंद शेडगे आणि अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच अंतर्गत समाविष्ट सर्व महाविद्यालयांमध्ये मैदानी खेळ, बैठे खेळ, पोस्टर सादरीकरण, प्रतिकृती बनविणे, फार्मा मार्केटिंग अशा अनेक विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला.

बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये विजयी व उपविजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळ चे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च, आळे, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे, शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खानापूर, जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर, श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी माळवाडी, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संगमनेर, मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. अनुराधा ताजवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व डॉ. शिल्पा कोल्हे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे