दुग्ध दिनी गणेश दूध संस्थेच्या वतीने गवळ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
1 min read
राजुरी दि.२:- राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने १जून जागतिक दूध दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येकालाच दुधाचे फार महत्त्व आहे.अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दुधाचे महत्त्व आहे.तसेच दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात.जागतिक दूध दिवसाचे औचित्य साधून रविवार (दि.१) रोजी सकाळी सात वाजल्यापासून गणेश दूध संस्थेमध्ये दुधाचे संकलन केले जाते.
त्यावेळी दूध उत्पादक गवळी दूध संकलनासाठी गणेश दूध संस्थेत आल्यानंतर दूध उत्पादकांना गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, व्हा.चेअरमन दिलीप घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, तुकाराम डुंबरे, माऊली घंगाळे, साईनाथ हाडवळे, गंगाराम औटी,
विक्रम डुंबरे, सुधीर डुंबरे, संजय औटी, निलेश हाडवळे, किसन गुळवे, सुवर्णा औटी, ज्योती हाडवळे, संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे यांच्यासह दूध उत्पादक गवळी बांधव, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था ही राजुरी गावामध्ये एकमेव दूध संकलन करणारी संस्था असून गावातील सर्व दूध उत्पादक गवळी या संस्थेला दूध पुरवठा करत आहेत.
या गावात 80 टक्के शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहेत. गणेश दूध संस्थेने दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करीत आहे. सहकार तत्वावर चालणारी ही संस्था नावाजलेली असून संस्थेला यापूर्वी देश पातळीवर सहकार क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच या संस्थेला आतापर्यंत अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पुढील काळात गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दूध उत्पादक गवळी बांधवांना दूध उत्पादनासाठी अभ्यास वर्ग तसेच वेगवेगळे उपक्रम संस्था राबवणार असल्याची माहिती चेअरमन सुभाष औटी यांनी दिली.