लालपरिचा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा

1 min read

मुंबई दि.२:- राज्यातील खेड्या पाड्यातून, गावागावातून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७७ वर्षांची झाली आहे. आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एस.टी. बसची स्थापना होऊन आज ७७ वर्षं पूर्ण झाली. आज ही जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ हे घोषवाक्य सार्थ करत एस.टी. मार्गक्रमण करत आहे. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. १९२० सालच्या सुमारास अनेक उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केली होती. त्यामुळे हेवेदावे आणि अनियंत्रित भाडेवाढ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम (The Motar Vehicle Act) १९३९ अस्तित्वात आणला गेला. कायद्याने खाजगी वाहतूक व्यावसायिकांची संघटना तयार करण्यात आली. प्रवाशांसाठी खूप सोयी निर्माण झाल्या. ठराविक थांबे, वेळापत्रक, निश्चित भाडे इत्यादी सुविधांमुळे प्रवास सुखकर होऊ लागला. यानंतर १९४८ साली पुणे ते नगर पहीली एसटी सूरू झाली.एका आंब्याच्या झाडाखाली बसून वा.नियंत्रक बसची नोंदणी व मार्गदर्शन करत होते.मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या. त्यानंतर १९५० मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या, दोन आरामदायी सुविधा असणाऱ्या बसगाड्या चालवण्यात आल्या. . दोन दोन आसनांच्या रांगा, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आणि हिरव्या रंगाच्या काचा असा या गाड्यांचा थाट होता. पुढे वेगळा महाराष्ट्र बनल्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या भागातली वाहतूक सेवा आणि BSRTC यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच MSRTC ची स्थापना करण्यात आली. आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० हून अधीक वाहने आहेत. निम-आराम सेवेसाठी हिरकणी तर वातानुकूलितसाठी शिवनेरी, एशियाड,शिवशाही बस उपलब्ध आहेत. आज खेड्यापाड्यात जाऊन गोरं गरीबांची सेवा देणारी ही एसटी होय.

आज गावागावात, विद्यार्थी, पत्रकार, आमदार खासदार,यांचा प्रवास एसटी हा या राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच होत आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे