जुन्नरच्या ३२ शाळांना २५ कोटी १९ लक्ष निधी मंजूर:- आमदार शरद सोनवणे

1 min read

जुन्नर दि.२:- जुन्नर तालुक्यातील ३२ शाळा आदर्श शाळा बनणार असून त्यासाठी महायुती सरकारने २५ कोटी १९ लक्ष ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून नवीन वर्ग खोल्या, प्रवेशद्वार व व्यासपीठ, पदपथ व हँडवॉश स्टेशन, शौचालय व संरक्षण भिंत, विद्यार्थ्यांसाठी बसण्याची जागा आदी सुविधा बनविण्यात येणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून बुचकेवाडी, इनामवाडी, येणेरे, करंजाळे, पिंपळगाव जोगा, नळवणे, गुंजाळवाडी (बेल्हे), साकोरी, गोद्रे, राजूर नं.१, निमगिरी, घाटघर, इंगळून, उंब्रज नं. १, गणेशनगर (येडगाव), खानगाव, हिवरे तर्फे मिन्हेर, उच्छिल, आलमे, चिंचोली मराठी, वडगाव सहानी, कुरण, चाळकवाडी, ओतूर नं.१, मांजरवाडी, नारायणगाव नं. २, बोरी खुर्द, डुंबरवाडी, वडगाव कांदळी, वसईवाडी, निमसे मळा, उदापूर येथील शाळा आदर्श शाळा बनविण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे