सिंहगड मध्ये विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

1 min read

वडगाव बुद्रुक दि.१७:- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे -४१ येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये सेंट्रल प्लेसमेंट सेल व रुबीकॉन् ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवशीय विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आल्याचे प्रा. मंजुषा नामेवार व प्रा तुषार काफरे यांनी सांगितले.प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याबद्दल माहिती देत असताना तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांना माहिती व उद्योग क्षेत्रातील वापरले जाणारे अद्यवत् तंत्रज्ञान आणि वापर याबद्दल अवगत करणे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील नामांकित रुबीकॉन् ट्रेनिंग सेंटर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यामध्ये श्रुती कांबळे यांनी किमान कौशल्य विकास या संदर्भात मार्गदर्शन केले. आदेश साळुंखे यांनी नैसर्गिक क्षमता व कौशल्य विकास याबद्दल बोलत असताना विविध प्रत्यक्षिके करून घेतली. वैष्णवी मालुसरे यांनी पायथॉन लँग्वेज बद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्रचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग चे विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख डॉ. अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजीनियरिंग मधील प्रशिक्षण व रोजगार विभागाचे प्रमुख प्रा. सी. आर. कुवर व प्रा. मोहिनी देवरे यांनी यांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे कामकाज पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे