दिशा कृषी उन्नतीची अंतर्गत कृषी विभागाकडून निरक्षक अंबा उत्पादन प्रशिक्षणाचे आयोजन
1 min read
जुन्नर दि.२:- दिशा कृषी उन्नतीची या जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प संचालक आत्मा पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख पाच पिकांची कष्ट तयार करण्याच्या सूचना आहेत. जुन्नर,आंबेगाव,खेड, शिरूर या तालुक्यातील केळी आंबा व स्ट्रॉबेरी पिकांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31/5/25 रोजी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या येथे निर्यातक्षम आंबा पिकाचे उत्पादन मार्केटिंग याविषयी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशा बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, कृषी रत्न व ग्रामोन्नती मंडळाचे चेअरमन अनिल मेहेर, प्रकल्प उपसंचालक श्रीधर काळे, उपविभागी कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी प्रमोद बनकर,
तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले सर्व मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा चे सूर्यकांत विरनक व जुन्नर तालुक्यातील आंबा बागायतदार यांनी भरभरून प्रतिसाद दिला व उपस्थिती दाखवली तसेच डेक्कन व्हॅली शेतकरी कंपनीचे व सह्याद्री कंपनी नाशिक चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकारे डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक वामन यांनी सदर प्रशिक्षणात सह्याद्री कंपनी नाशिकच्या माध्यमातून आंबा निर्यात करण्याचे आश्वासन उपस्थित आंबा बागायतदारांना दिले व अंबा उत्पादक बागातदारांना दिलासा दिला तसेच मार्गदर्शन केले.
आत्म्याचे उपसंचालक श्रीधर काळे यांनी उपस्थित आंबा बागायतदारांना दिशा कोणी कृषी उन्नतीची या उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यात स्थापन होणाऱ्या क्लस्टर विषयी शुभेच्छा दिल्या. जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य व जुन्नर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आशा बुचके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शुभेच्छा देत
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. कृषिरत्न अनिल मेहेर यांनी शिवनेरी हापूस मानांकन मिळाल्याचे उल्लेख करून उपस्थित आंबा उत्पादक बागायतदारांना आश्वासित केले शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आंबा निर्यात केल्यास मोठी क्रांती घडू शकते.
त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काम करणे मार्केटिंग निर्यात उत्पादन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीला बळकटीकरण होण्यासाठी मदत करण्याचे आव्हान केले. शीत साखळी तयार करणे निर्यात विषयक धोरणे याविषयी अधिक माहिती उपस्थित आंबा बागायतदारांना दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ शिंदे यांनी आंबा लागवड बागेचे नियोजन घन अति घन आंबा लागवड पाणी व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे पिक संवर्धन शास्त्रज्ञ डॉ दत्तात्रय गावडे यांनी आंबा पिकावर येणाऱ्या किडी व रोग याविषयी मार्गदर्शन केले.
विशेषतः आंबा पिकावर येणारी किड फळमाशी विषयी नियंत्रण व उपायोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी उपस्थित यांचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉ राहुल घाडगे यांनी केले.