राजुरीत सविता हाडवळे व प्रमिला औटी यांना अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार

1 min read

राजुरी दि.२:- महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचेकडून सामाजिक क्षेत्रात उत्कॄष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कर्तबगार दोन महिलांना हा पुरस्कार देणेबाबत शासन निर्देश होते. त्यानुसार राजुरी ग्रामपंचायतीने अंगणवाडी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सविता हाडवळे यांना व महिला बचत गटांसाठी व आरोग्य देवा पुरवण्याचे काम करणा∙या आशा स्वयंसेविका प्रमिला औटी यांना हा पुरस्कार गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ शिंदे , एम डी घंगाळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकिर चौगुले, गौरव घंगाळे, मिना आवटे, शितल हाडवळे, सुप्रिया औटी, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, रुपाली औटी, ढोरे भाऊसाहेब, नितीन औटी, गावातील सर्व अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे