इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1 min read
पुणे, दि.१९:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, विलंब शुल्कासह १ ते १५ डिसेंबर, अतिविलंब १६ ते २३, अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २४ ते ३१ डिसेंबर आहे. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क अनुक्रमे ५० व १५० रुपये आहे.