समर्थ पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा संपन्न
1 min readबेल्हे दि.१९:-समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा व भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील विविध विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.प्रमुख पाहुणे म्हणून एल अँड टी प्रिसिजन इंजिनियरिंग सिस्टीम तळेगाव येथील सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर आनंद कुलकर्णी तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर गोरखनाथ औटी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण असावा.विद्यार्थ्यानी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी व प्रत्येक वेळी आपल्यामधील उणिवा दुर करून परिपूर्ण बनावे असे यावेळी आनंद कुलकर्णी म्हणाले.ही स्पर्धा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिकक्स, कम्प्युटर अँड आयटी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि अप्लाइड सायन्स अशा सहा ग्रुप मध्ये घेण्यात आली.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-विज्ञान प्रश्नमंजुषा (प्रथम वर्ष):-प्रथम क्रमांक-समृद्धी सोनवणे (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे )द्वितीय क्रमांक-तनुजा वाबळे (समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे )तृतीय क्रमांक-अनुराग दांगट आणि सिद्धेश औटी (समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे)(तांत्रिक प्रश्नमंजुषा)सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप:प्रथम क्रमांक-कृष्णराज मंडलिक आणि वैभव पवार (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर)द्वितीय क्रमांक-सलोनी ढेरंगे आणि सानिका शेरकर (समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे)तृतीय क्रमांक-श्रवण औटी (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)तांत्रिक प्रश्नमंजुषा कम्प्युटर ग्रुप-प्रथम क्रमांक-सोहम शिंदे आणि ओमकार भोर (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)द्वितीय क्रमांक-नंदिनी चित्ते आणि लीना गुंजाळ (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, बेल्हे)तृतीय क्रमांक-सुरभी जाधव आणि खटाळे वैष्णवी (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर)तांत्रिक प्रश्नमंजुषा मेकॅनिकल ग्रुप-प्रथम क्रमांक-अनिकेत गुंजाळ (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)द्वितीय क्रमांक-साहिल मुळे (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)तृतीय क्रमांक-यश चिंचवडे (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)तांत्रिक प्रश्नमंजुषा इलेक्ट्रिकल ग्रुप,प्रथम क्रमांक-शंतनु बाळसराफ आणि निखिल मुंढे (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे) तृतीय क्रमांक-ऋषिकेश रासकर आणि अभिषेक झिंजाड (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)तृतीय क्रमांक-ऐश्वर्या मगर (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर)पोस्टर प्रेसेंटेशन-भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धा प्रथम क्रमांक-अक्षदा कोटकर आणि मानसी जाधव (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक,संगमनेर)द्वितीय क्रमांक-गौरी लोहटे (गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक अवसरी)तृतीय क्रमांक-ज्ञानेश पाडेकर (समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे)उत्तेजनार्थ-गोकुळ महाजन आणि ऋतुराज थोरात (एस पी आय टी पॉलीटेक्निक कुरुंद) बक्षीसपत्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक,सन्मानचिन्ह आणि ५० हजार हून अधिक रोख रकमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.श्याम फुलपगारे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.स्वप्नील नवले,प्रा.संकेत विगे,प्रा.आशिष झाडोकर आदि उपस्थित होते.