सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग मध्ये कार्यशाळा संपन्न
1 min readराजुरी दि.२०:- येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी (ता.जुन्नर) येथे मेटलॅब GUI सॉफ्टवेअर या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी थेरॉटिकल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आले. या कार्यशाळेचे संपूर्ण मार्गदर्शन रायसोनी इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्रा. सदाशिव बडिगेर यांनी केले. या कार्याशाळेत ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तत्पूर्वी या कार्यशाळेचे उद्घाटन सह्याद्री व्हॅली कॉलेजचे संचालक सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य पी. बालारामडू यांनी केले.
या कार्यशाळेचे फायदे पुढीलप्रमाणे
P1. साधे आणि लक्षात ठेवण्यास सोपे वाक्यरचना.2. शक्तिशाली इनबिल्ट कार्ये. 3. MATLAB सेंट्रल वेबसाइटवर फाईल एक्सचेंज सारख्या फोरमवर मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध असल्यामुळे C किंवा Java च्या तुलनेत कल्पना ते अंमलबजावणीपर्यंत लागणारा वेळ कमी आहे.
4. अलीकडील बहुतेक संशोधक त्यांच्या कल्पना अंमलात आणण्यासाठी आणि जर्नल लेखांमध्ये MATLAB चा वापर सांगण्यासाठी भाषा म्हणून MATLAB चा वापर करतात. 5. मॅथवर्क वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मदतीने प्रोग्रामिंग रचनांबद्दल सहजपणे शिकता येते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे संचालक किशोरभाई पटेल, सचिन चव्हाण सर प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू तसेच परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मनोज कुमार आणि प्रा. मिनाज पटेल यांनी केले.