समर्थ अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांची “किरण अकॅडेमी” या कंपनीमध्ये निवड

1 min read

बेल्हे दि.२२:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची “दि किरण अकॅडमी” या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.कॅम्पस ड्राईव्ह २०२४ अंतर्गत “किरण अकॅडमी” या कंपनीच्या वतीने कॉप्यूटर,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीसीए, एमसीए,एमसीएस विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन नुकतेच समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या महाविद्यालयात करण्यात आले होते.“किरण अकॅडमी” ही लोकप्रिय सॉफ्टवेअर प्रशिक्षण देणारी संस्था आहे.इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांमधील गॅप भरून काढण्यासाठी कालानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे व प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा हेतू आहे.या संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जाव्हा फुल स्टॅक, सॉफ्टवेअर टेस्टिंग,पायथॉन फुल स्टॅक आदी प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.विविध मल्टीनॅशनल कंपन्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्याचे काम ही संस्था करते.कंपनीच्या वतीने नवम तिवसकर यांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली.त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेद्वारे कल चाचणी घेण्यात आली.त्यानंतर सांघिक चर्चा व व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित मुलाखत घेण्यात आली.संवाद कौशल्य,सांघिक भावना, विश्लेषणात्मक विचारांची ओळख,सॉफ्ट स्किल ज्ञान आणि विषयाबाबतचे ज्ञान या घटकांचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती नवम तिवसकर यांनी दिली.अंतिम टप्प्यातील मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्ये,विशेषज्ञता,सॉफ्ट स्किल्स आणि प्रस्तावित पदांसाठी त्यांची एकूण पात्रता तपासली गेली.या मुलाखतींमध्ये सखोल चर्चा आणि व्यक्तिमत्व मूल्यांकनासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्याच दिवशी मुलाखतींचे निकाल जाहीर करण्यात आले. आणि १० उत्कृष्ट उमेदवारांची “किरण अकॅडमी” च्या वतीने विविध अभ्यासक्रमांच्या इंटर्नशिप आणि प्लेसमेंट साठी निवड करण्यात आली.निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: सिद्धांत वाकचौरे,ऋतुजा धुमाळ,निशिगंधा पिंगट,दीक्षा कुलकर्णी,साक्षी थोरात,मानसी भोर,पायल पाडेकर, कल्याणी पवार,प्रद्युम्न भोर,तुषार शिंदे.सदर मुलाखतीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे