सिंहगड मध्ये शैक्षणिक सहलीचे परफेक्टो रोबोटिक्स प्रा. लि. धायरी येथे आयोजन

1 min read

सिंहगड दि.१७:-सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये इलेक्ट्रॉनिक्स स्किल डेव्हलपमेंट विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबद्दल माहिती मिळावी म्हणून सदर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. मंजुषा नामेवार व प्रा. तुषार काफरे यांनी याबाबत माहिती दिली. कोमल् भगत् यांच्या संकल्पनेतून पी एल सी ऑटोमेशन या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या परफेक्टो रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये विविध बनावटीचे पी एल सी व त्याचे संबंधित माहिती तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. यातून विद्यार्थ्यांना ऑटोमेशन क्षेत्रामध्ये असलेल्या संधी व उपकरणे यांची माहिती देण्यात आली प्रसंगी परफेक्ट रोबोटिक्स प्रा. लि. च्या मानवी संसाधन प्रमुख जानवी पुरंदरे व इतर स्टाफ उपस्थित होता. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागातून तृतीय वर्ष अभियांत्रिकीचे ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते.या शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्राचार्य वाय. पी. रेड्डी, विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी याचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा. गणेश गायकवाड प्रा. प्रशांत डहाळे प्रा. तुषार काफरे व प्रा. एस. बी. नलावडे यांनी सदर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे