ढगीमळा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांना संकल्प पत्राचे वाटप

1 min read

बेल्हे दि.१६:- सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक संकल्प करावयाचा आहे. आम्ही असा संकल्प करतो की आम्ही भारताचे नागरीक लोकशाहीवर निष्ठा ठेऊन आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू. आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणूकांचेपावित्र राखू या निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू असा संकल्प पत्र ढगेमळा, बेल्हे (ता.जुन्नर) जिल्हा परिषदेच्या सर्व मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादू कुरकुटे यांनी संकल्प पत्रा विषयी माहीती सांगीतली. उपशिक्षक गणेश बिडवई यांनी मुलांना संकल्प पत्र भरण्याविषयी मार्गदर्शन केले. या कामी बेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान बेलकर बेल्हे बीटचे विस्तार अधिकारी धोंडगे व जुन्नर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे