जागतिक पर्यावरण दिनी राजुरी ग्रामपंचायतीकडून दशक्रिया विधीत आंबा रोपांचे वाटप

1 min read

राजुरी दि.५:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजुरी ग्रामपंचायतीने एक स्तुत्य व समाजप्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला. गावातील दशक्रिया विधीच्या वेळी मयत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना आंब्याचे रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचे अनोखे संदेश देण्यात आला.

या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मयत झालेल्या व्यक्तीच्या दशक्रिया स्थळी येणाऱ्या कुटुंबीयांना एक आंबा रोप देण्यात आले. “मृत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक नवा जीवनवृक्ष” या संकल्पनेतून, या उपक्रमाची मांडणी करण्यात आली होती.

“जीवन आणि मृत्यू याचा संगम असलेल्या या क्षणी, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे हे काळाचे भान आहे. हे रोप भविष्यासाठी जीवंत श्रद्धांजली ठरेल.” हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरत असून भविष्यातही असेच पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला.

कार्यक्रमाप्रसंगी सरपंच प्रिया हाडवळे उपसरपंच माऊली शेळके, बाळासाहेब औटी, एम डी घंगाळे, वल्लभ शेळके सर, जी. के औटी, लक्ष्मण घंगाळे, डॉ. बाळकृष्ण घंगाळे, दत्तात्रय हाडवळे, निलेश हाडवळे, अशोक औटी, बबुशा घंगाळे, महादेव हाडवळे, ह. भ. प. काचळे , नामदेव औटी, अनंथा घंगाळे व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!