जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वळसे पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण
1 min read
निमगाव सावा दि.५:- “जागतिक पर्यावरण दिन” या निमित्त महाविद्यालय व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन संपन्न झाला.
यानिमित्त आज महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरामध्ये क्रिस्टीना फायकस या 450 वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी लेखापरीक्षक बाबासाहेब बांगर, नवनाथ जोगी,ओंमकार वाळके ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे, प्रा. अनिल पडवळ, ग्रंथपाल मंगल उनवणे,
प्रा. अजय ननवरे, अनिकेत वायकर, पूजा थिगळे, शांताराम गाडगे, जितेंद्र बोटकर आधी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. सदरचा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार तसेच संस्थेचे सचिव परेशशेठ घोडे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त करून कौतुक केले.