राजुरीतील गणेश दूध संस्थेच्या वतीने वृक्षारोपण
1 min read
राजुरी दि.७:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला एक पेड मॉ के नाम भारत सरकार तथा सहकार मंत्रालय उपक्रमांतर्गत अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या अंतर्गत राजुरी (जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने झाडांची वृक्ष लावगड ज्योती हाडवळे, निशा औटी या महिलांच्या हाताने करण्यात आली.
यावेळी गणेश सहकारी दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, व्हा.चेअरमन दिलीप घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, तुकाराम डुंबरे, माऊली घंगाळे, साईनाथ हाडवळे, गंगाराम औटी, सुधीर डुंबरे, संजय औटी, निलेश हाडवळे, मोहन हाडवळे, विक्रम डुंबरे, किसन गुळवे, ज्योती हाडवळे, सुवर्णा औटी,
संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे डॉ.योगेश औटी अशोक फावडे यांच्यासह दूध उत्पादक गवळी उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने वृक्षांना महत्त्व दिले पाहिजे.तसेच प्रत्येक दूध उत्पादक गवळ्याने एक वृक्ष लागवड करावी असे आव्हान गणेश दूध संस्थेच्या वतीने करण्यात आले.